भोसरीत गॅस कटरने दोन एटीएम फोडले; 35 लाखांची चोरी

0

पिंपरी चिंचवड : गॅस कटरच्या सहाय्याने भोसरीतील दोन एटीएम मशीन कापून त्यातील 35 लाख 26 हजार 100 रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना येथे घडली. या घटनेबाबत, सचिन शिवकरण काळगे (वय 21, रा.बापूजीबुवा नगर, थेरगाव) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धावडेवस्ती भोसरी येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची दोन एटीएम आहेत. शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान एटीएम सेंटरमधील दोन एटीएम मशिन गॅस कटरच्या साहाय्याने कापले. त्यातील 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.