भोसरी गावजत्रा मैदानावर 5 मार्चला राष्ट्रवादीचा मेळावा

0

पिंपरी चिंचवड: आगामी शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर भोसरी गावजत्रा मैदानावर मंगळवारी (दि.5) सायंकाळी 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन क रण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भूजबळ, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या नियोजनासाठी भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक रविवारी घेण्यात आली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीच्या शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी नगरसेवक पंडीत गवळी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रचाराचा श्रीगणेशा भोसरीतून 
शिवसेनेचे पुर्वाश्रमीचे पुणे जिल्हा संर्पक प्रमुख तथा स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील सिनेअभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याच्या प्रवेशाने शिवसेनेला चांगलाच धक्कातंत्र मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरुर लोकसभा निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे किंवा डॉ. अमोल कोल्हेंना उतरविणार येणार आहे. त्यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा भोसरीतील गावजत्रा मैदानातून होणार आहे. याकरिता शिरुर लोकसभा मतदार संघातील भोसरी, चाकण, खेड, आंबेगाव, राजगूरुनगर, शिरुर आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादीच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संजोग वाघेरे पाटील यांनी केले.