मंगळवारपासून पुन्हा अनलॉक

1

जळगाव: जळगाव, भुसावळ आणि अमळनेर उद्या मंगळवारपासून अनलॉक होणार आहे. जिल्हाधिकारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७ जुलैपासून जळगाव, भुसावळ आणि अमळनेर याठिकाणी लॉकडाऊन लागु केला होता. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर उद्यापासून अनलॉक होणार आहे. सात दिवसांचा हा जनता कर्फ्यू यशस्वी झाल्याचा दावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केला.