मंडईतील गोदामाला आग

0

पुणे : अखिल मंडई गणपती मंदिरा मागील बाजूस असणार्‍या जुन्या वाड्यातील गोदामास आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8.30च्या सुमारास घडली. या आगीत गोदामाशेजारील दोन घरे जळाली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आग लागल्यानंतर अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यात 3 टँकर आणि 4 अग्निशमन विभागाच्या गाड्या यांचा समावेश होता. जुन्या वाड्याच्या मागील बाजूस असणार्‍या एका गोदामाला ही आग लागली होती. त्यात जुनी बारदाने व अन्य वस्तू होत्या. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. गोदामाला लागलेल्या आगीत मात्र शेजारील दोन घरांना त्याची झळ बसून ती घरे जळाली आहेत. त्यात अनेक गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.