मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिकार्‍यांची प्रशिक्षणांतर्गत मनपास भेट

0

पिंपरी चिंचवड ः महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिकार्‍यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्र
व मलनि:सारण प्रकल्पास भेट दिली. यशदा प्रशिक्षण केंद्र पुणे, यांच्यातर्फे अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मंत्रायलातील अर्थ मंत्रायलयाचे सहसचिव ज्ञानदेव सुळ, नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बदान, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी, उर्जा व उद्योग विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, शहर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, ग्रामिण विकास विभागाचे उपसचिव एकनाथ गागरे, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाचे उपसचिव राजेंद्र गेंगजे, नियोजन विभागाच्या उपसचिव विद्या हंपय्या, वसई विरार महानगरपालिकेचे अति. आयुक्त रमेश मनाले, कामकार कल्याण विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंदवार, अल्पसंख्यांक विकास विभागाचे उपअभियंता दिनेश सोनवणे, मृदसंधारण विभागाचे उपसचिव मच्छिंद्रनाथ शेळके, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात उपस्थित होते. महानगरपालिकेचे मलनि:सारण व पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी मलनि:सारण प्रकल्पाची तर कार्यकारी अभियंता प्रविण लडकत यांनी जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील मोकळ्या जागेवर मंत्रालयातील अधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. यशदाचे समन्वयक गोरक्ष गोफणे यांनी आभार मानले.