व्हिडीओ…सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा -हर्षवर्धन जाधव

0
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रालयासमोर ठिय्या 
केसरकरांना गांर्भियाची जाणीव असायला हवी – हर्षवर्धन जाधव


मुंबई-मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा देणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंत्रालयाच्या समोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. जोवर हे सरकार मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढत नाही. तोवर मी ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा जाधव यांनी सराकारला दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकार काहीच करत नाही हे माझ्या लक्षात आल्यावर मी राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा राज्यपालांच्या एडीसीसींशी बोललो आणि हे सरकार जर अध्यादेश काढत नसेल तर हे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान दुपारी त्यांना पोलिसांनी अटक करून विधानभवन पोलीस चौकीत घेऊन गेले, तिथून त्यांना सोडण्यात आले. आता औरंगाबादला जाऊन करामती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढे मोठा निर्णय घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दीपक केसरकरांवर केली टीका  
शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आहे. आज तर त्यांनी शिवसेना आमदार आणि राज्याचे ग्रहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यावर टीका करत त्यांना घरचा आहेर दिला. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट काही होऊ शकली नाही पण त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या दिपक केसरकर यांनी काय बरं आहे का? असे मला विचारल्याचे सांगत राज्यात तरूण आत्महत्या करत आहेत आणि राज्याचे ग्रहराज्यमंत्री असे वक्तव करत असतील तर काय म्हणावे अशी संतप्त प्रतिक्रिया जाधव यांनी जनशक्तिशी बोलताना दिली. दरम्यान दिपक केसरकर हे या गंभीर विषयाला सहजपणे घेत आहेत ते राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. जेव्हा आत्महत्येसारखी घटना होत असतात तेव्हा सगळ्यात आधी त्याची नोंद ग्रह विभागाकडे असते त्यामुळे केसरकरांनी या गोष्टी सहजपणे  घेऊ नयेत असा सल्ला देखील हर्षवर्धन जाधव यांनी दिला. ताबडतोब अध्यादेश काढून तो कोर्टात टिकणार नाही. मात्र आपल्याला काही तरी केले पाहिजे की लोकांना वाटेल हे सरकार काही तरी लोकांसाठी काम करत आहे असे जाधव यांनी सांगितले.