मधमाशांच्या हल्ल्यात भाजपा नगरसेवकासह तिघे महिला जखमी

0

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना ; आंदोलकही धावले सैरावैरा

नंदुरबार- जिल्हाधिकारी कार्यालयात मधमाश्यांनी हल्ला चढवल्याने भाजपचे नगरसेवक प्रशांत चौधरी यांच्यासह तीन महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी चार वाजेच्या सुमारास घडली. मधमाशांच्या हल्ल्यामुळे आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांना देखील पळायची वेळ आली. जखमी नगरसेवक चौधरी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी यांचे वाहन ज्या ठिकाणी उभे राहते त्याच ठिकाणी मधमाश्यांचे पोळके असून खवळलेल्या मध माश्यानी अचानक हल्ला केल्याने नागरीकांची चांगलीच धावपळ उडाली.