मध्यप्रदेशातील कृषी धोरणांची कृउबा सचिवांनी जाणली माहिती

0 1

बर्‍हाणपूर-रावेर बाजार समितीत समन्वयासाठी बैठक: कृषी धोरणांवर चर्चा

रावेर- मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कृषी माल, कृषी टॅक्स व कृषी धोरणांबद्दल माहिती जाणून घेतली. रावेर बाजार समितीत झालेल्या बैठकीत कृषी धोरणांवर तब्बल तासभर चर्चा करण्यात आली. बर्‍हाणपूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रामवीर किरार, सहाय्यक सचिव सुनील पाटील यांनी रावेर बाजार समितीला भेट देऊन महाराष्ट्र राज्याच्या कृषी धोरणांविषयी माहिती घेतली. बाजार समिती सचिव गोपाळ महाजन यांनी मध्यप्रदेश राज्यातील कृषी धोरणाची माहिती जाणून घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बर्‍हाणपूरपेक्षा रावेरची मार्केट फी अल्प
मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर बाजार समितीत सर्व शेतीवरील मार्केट फी दोन रुपये 20 पैसे असून रावेर बाजार समितीची फि त्यांच्यापेक्षा अल्प म्हणजे एक रुपया पाच पैसे आहे. बर्‍हाणपूरला केळी लिलाव पध्दत आहे. दोनही ठिकाणावरील मार्केट फी, अडत फी, हमाली-तोलाई कृषी टॅक्स, केळी वाहतूक करणारे ट्रक यांच्या जवळील कृषी पावत्या यासह अनेक विषयांवर चर्चा करून एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.