मध्य प्रदेशमध्ये मालवाहू रेल्वेची समोरासमोर धडक; तीन कर्मचारी ठार !

0

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये दोन रेल्वे मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सिंगरोली जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. कोळसा वाहून नेणाऱ्या या मालगाडी होत्या. भरधाव वेगात असताना समोरासमोर धडक झाल्याने इंजिनचा चुराडा झाला आहे. काही डबे घसरले आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. बैढन ठाणा क्षेत्रातील रिहन्द नगर येथून एक मालगाडी कोळसा वाहून नेत होती. तर, दुसऱ्या दिशेने रिकामा मालगाडी येत होती. या दोन्ही मालगाड्यांची समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही गाड्यांचे डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या रेल्वेगाडीत अडकून 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा भीषण अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे अपघात झाला आहे.