मध्य प्रदेश: छत्रपतींचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविणार; अधिकाऱ्यांची चौकशी होणार !

0

छिंदवाडा: मध्य प्रदेशातील छिंदवाडा-नागपूर हायवेवरील एका चौकामधील शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवण्यात आल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने हटवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारवर देशभरातून टीका होत आहे. दरम्यान राज्य सरकारने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. पुतळा हटवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच हा पुतळा पुन्हा बसवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा टि्वट करुन प्रशासनाच्या कृतीविरोधात संताप व्यक्त केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राचा गौरव असून, देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचा अपमान अजिबात सहन करणार नाही. तुम्हाला आक्षेप होता तर, सन्मानपूर्वक तुम्ही पुतळा हटवायला हवा होता. पण या सरकारला महापुरुषांचा अपमान करण्यामध्ये गर्व वाटतो” अशा शब्दात शिवराज सिंह चौहान यांनी आपला संताप व्यक्त केला.