माजी महापौर ललीत कोल्हे कायद्याला जुमानत नाही

0

जामीनअर्जांवर सरकारपक्षातर्फे न्यायालयात युक्तीवाद


जळगाव: बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्लयाप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात चार संशयितांना अटक करण्यातआली आहे. त्यात दोन जणांचे जामीनावर कामकाज होवून न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळून लावले आहे. त्यात जामीन मंजूर करुन नये म्हणून पोलिसांनी सरकारपक्षातर्फे कारणे सादर केली. यात गुन्ह्यात फरार असलेले संशयित ललील कोल्हे याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून ते कायद्याला जुमानत नसल्याचे म्हटले आहे. तसेच शिक्षा झालेली असतांनाही महापौर झाला असून त्याच्याकडे राजकीय आर्थिक पावर असल्याने फिर्यादी खूबचंद साहित्या यांच्या जीवास धोका असल्याचे नमूद आहे.

महिन उलटूनही ललीत कोल्हे फरार

शहरातील व.वा.वाचनालयाजवळील गोरजाबाई जिमखान्याच्या समोर खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना 16 जानेवारी रोजी घडली होती. याप्रकयाप्रकरणी दाखल गुन्ह्यात राकेश चंदू आगारीया, निलेश उर्फ बंटी नंदू पाटील वय 24 रा. जळगाव, नरेश चंदू आगारीया वय 24 रा. वाघनगर व गणेश अशोक बााविस्कर रा. तुरखेडा यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान दीड महिना उलटूनही संशयित ललीत कोल्हे रा. कोल्हेनगर अद्याप फरार आहे.

अशी आहे जामीन नामंजूरची कारणे

अटकेतील नरेश आगारीया व गणेश बाविस्कर या दोघांतर्फे मंगळवारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आले. यात न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात कामकाज झाले. या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असून गुन्हा बीगर जामीनकीचा, सत्र न्यायालयात चालणार आहे, संशयित हा गुंडगिरी करण्यासाठी ललीत कोल्हेकडे बॉडीगार्ड, ड्रायव्हर आहे, संशयित जामीनावर सुटल्यावर ललीत कोल्हे यास फरार राहण्यास मदत करतील, तसेच साक्षीदारांना धमकावून तपासकामी अडथळा निर्माण करतील, या कारणांच्या आधारावर सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी युक्तीवाद केला. न्या. कटारिया यांनी दोघांचे जामीनअर्ज फेटाळून लावले आहे.