मनसेची महामोर्चासाठी जोरदार तयारी !

0

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सीएए, एनआरसी कायद्याला पाठींबा असल्याचे सांगितले होते. यावेळी राज ठाकरे यांनी ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत कायद्यासाठी समर्थनार्थ महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या महामोर्चासाठी मुंबईतील मनसे सैनिकांनी मोर्चा यशस्वी होण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या महामोर्चात जास्तीतजास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी सोशल मीडियावरुन जोरदार प्रचार केला जात आहे.

मुंबईत काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी टेबल लावून मोर्चाला येणाऱ्या नागरिकांची नाव नोंदणी सुरु केली आहे.मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी, बांगलादेशींना घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्या महामोर्चा आयोजित केला आहे. हिंदूह्दयसम्राट आपल्याला बोलू नका असे राज ठाकरेंनी बजावल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक अशी टी-शर्ट छापली आहेत. काहींनी मोर्चासाठी राज ठाकरेंच्या आवाजातील व्हिडीओ बनवले आहेत.