मनसेच्या अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष !

0

मुंबई: महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आज मुंबईत होत आहे. राज्यभरातून मनसे सैनिक या अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाले आहे. राज ठाकरे हिंदुत्वाची वाट स्वीकारणार का? आणि मनसेच्या झेंड्यात शिवमुद्रेचा वापर केला जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत.

अधिवेशन स्थळी चहापानापासून भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. मनसेने आपल्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा वापरू नये, अशी भूमिका काही मराठा संघटनांनी घेतली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीमुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे आपल्या पक्षाची नवी भूमिका मांडणार आहेत. ती भूमिका काय असेल, याकडं आता सर्वांचे लक्ष लागले आहे.