ममता दीदींची गुंडगिरी पाहता पश्चिम बंगालमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करा: निर्मला सितारमण

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकी दरम्यान पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमधील संघर्ष अगदी टोकाला गेल्याचे याठिकाणी पाहायला मिळाले. दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालध्ये ममता दीदी वारंवार धमकी देत आहेत. आज संध्याकाळी मतदान संपल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसची माणसं पुन्हा हिंसाचार करतील अशी आम्हाला भीती असून जोपर्यंत पूर्ण निवडणूक प्रक्रिया संपत नाही तोपर्यंत सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावी अशी मागणी निर्मला सितारमण यांनी केली आहे.