मराठा समाज आरक्षण : निंभोरासीम पुलावर ठिय्या आंदोलन

0

रावेर- तालुक्यातील निंभोरा सीम पुलावर मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून दुपारी एक वाजेपर्यंत मात्र आंदोलनाला सुरुवात झालेली नव्हती.

आंदोलनात यांचा सहभाग
ठिय्या आंदोलनात जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जिजाबराव चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष योगेश महाजन, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील कोंडे, शिवसेना तालुका प्रमुख योगीराज पाटील, छावा संघटनेचे सुनील महाजन, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, विलास ताठे, बबलू महाजन, सुरेश पाटील, किशोर पाटील, विनोद पाटील, घनश्याम पाटील, बबलू सावंत, गणेश चौधरी, जिजाबराव पाटील, निलेश पाटील, देवानंद पाटील यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.