मराठी साहित्याचे अभ्यासक प्रा.जतीन मेढे यांना डॉ.आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

0 1

उद्या नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे होणार वितरण

भुसावळ- भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख तथा मराठी साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे यांना राज्यस्तरीय ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’ पुरस्कार जाहीर झाला असून शनिवार, 2 मार्च रेाजी नाशिक येथील कवी कालिदास कलामंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सामाजिक कार्याची शासनाकडून दखल
जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक व जिल्ह्यातील अभ्यासू वक्ता म्हणून तसेच वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे प्राध्यापक म्हणून प्रा.मेढे यांची ओळख आहे. त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने सन 2018-19 च्या राज्यस्तरीय ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’ पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. ते सन 1997 पासून ते भालोद (ता.यावल) येथील कला व विज्ञान महाविद्यालय येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत.