मला आणि माझ्या मुलीला भाजपकडून ऑफर होती; सुशीलकुमार शिंदेंचा गोप्यस्फोट

0

सोलापूर-सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरु आहे. यावरूनच माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मला आणि कन्या प्रणिती शिंदे यांना देखील भाजपची ऑफर होती, असा गोप्यस्फोट केला आहे. पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे आपण भाजप प्रवेशाची ऑफर धुडकावून लावल्याचे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. शिंदे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. एका वृत्तवाहिनीला शिंदे यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत शिंदे यांनी हा गोप्यस्फोट केला आहे.

भाजपच्या एका बड्या नेत्याची ऑफर होती. भाजपचा संबंधित नेता हा माझ्या तोडीचा होता, असे सांगत शिंदेंनी त्यांचे नाव जाहीर केले नाही. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबतही शिंदे यांनी मत व्यक्त केले. प्रत्येकाला करिअर करायचे असते. उमेदवारीवरून नाराजी म्हणून तरुण नेते पक्ष बदलत आहेत. वैचारिक भूमिका आहे. पण मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.