Saturday , April 21 2018

महाडचे चवदार तळे अतिक्रमणाच्या विळख्यात

महाड । सगळीकडे अतिक्रमणाचा विळखा वाढत असताना ऐतिहासिक स्थळे आता वाहनांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत चालली आहेत. याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येणार्‍या पर्यटकांना देखील त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण मानव जातीला समतेचा संदेश दिला,दि.20 मार्च 1927 रोजी चवदार तळे सत्याग्रह करुन सामाजिक क्रांतिची ज्योत पेटवली,त्या ऐतिहासिक चवदार तळ्याला अवजड वाहनाच्या अतिक्रमणाने वेधले आहे. या स्मारकाला राज्य शासनाने राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. या महत्वपुर्ण ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सभोवतालच्या काठावर अवजड वाहाने कायम स्वरुपी उभी केली जातात.या प्रकारा मुळे हा परिसर म्हणजे अधिकृत पार्किंग सेंटर झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने या परिसरला नो पार्किंग झोन जाहिर केला,परंतु पालिका प्रशासन आणि पोलिस यांच्या कडून कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली जात नसल्याने ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक म्हणजे वाहान तळ झाला आहे.या परिसराचे महत्व राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी तसेच कायम स्वरुपी उभी असलेल्या अवजड वाहान चालकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बौध्दजन पंचायत समिती,आरपीआय तसेच विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. राज्य शासनाने चवदार तळ्याचे ऐतिहासिक महत्व जाणुन तळ्याचे सौदर्यीकरण केले. अत्यंत महत्वपुर्ण आणि पवित्र असलेल्या चवदार तळ्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. दरवर्षी चवदार तळे सत्याग्रहाचा स्मृतीदिन भव्य स्वरुपात साजरा केला जातो.या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो भीम सैनिक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी चवदार तळ्याला भेट देतात. या परिसराचे महत्व वाढत असताना या परिसराकडे पालिका प्रशासन आणि पोलिसांचे पुर्ण दुर्लक्ष झाले असुन त्यामुळे येणार्‍या पर्यटकांची अत्यंत गैरसोय होत असल्याची तक्रार अनेक सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.

हे देखील वाचा

कंत्राटी कर्मचार्‍यांचे ‘वर्षा’वर ‘जवाब दो’ धरणे आंदोलन

मुंबई । राज्यातील सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे 23 एप्रिलपासून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!