महात्मा फुले मार्केटमधील 16 गाळ्यांचे उघडले सील

0

जळगाव– मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या महात्मा फुले आणि सेन्ट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांना प्रशासनाने थकबाकी भरण्यासाठी कलम 81 क ची नोटीस बजावली होती.ज्या गाळेधारकांनी एकही रुपयाचा भरणा केला नाही अशा 57 गाळेधारकांचे गाळे सील केले होते.मात्र या कारवाईविरोधात गाळेधारकांनी औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले होते.न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्या गाळेधारकांनी थकीत रकमेपैकी 10 लाखांचा भरणा केला अशा 16 गाळेधारकांच्या गाळ्यांचे सील उघडण्यात आले आहेत.
मनपा मालकीच्या 18 मार्केटमधील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. थकबाकी भरण्यासाठी प्रशासनातर्फे महात्मा फुले,सेन्ट्रल फुले,बी.जे.मार्केटसह पाच मार्केटमधील गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी कलम 81 क ची नोटीस बजावली होती.नोटीस मिळाल्यामुळे काही गाळेधारकांनी थकीत रकमेपैकी काही रकमेचा धनादेशाद्वारे भरणा केला.मात्र काही गाळेधारकांनी एक रुपयाचाही भरणा केला नाही.त्यामुळे मनपा प्रशासनाने गाळेधारकांची यादी करुन महात्मा फुले आणि सेन्ट्रल फुले मार्केटमधील जवळपास 57 गाळे सील केले. मनपा प्रशासनाने सील केल्याच्या कारवाईविरोधात काही गाळेधारकांनी मुबंई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात धाव घेवून अपिल दाखल केले होते.या अपिलावर सुनावणी होऊन न्यायालयाने दि.21 डिसेंबर रोजी गाळेधारकांना प्रत्येकी 10 लाखाचा भरणा करावा . भरणा केल्यानंतर सील उघडण्यात यावे असे आदेश दिले. 57 गाळेधारकांपैकी आतापर्यंत 16 गाळेधारकांनी मनपाकडे भरणा केला. त्यामुळे थकबाकी भरणार्‍या 16 गाळेधारकांच्या गाळ्यांचे सील उघडण्यात आले आहेत.