महापालिका ‘स्थायी’च्या अखेरच्या तीन दिवसात होणार चार सभा 

0 1
उद्या दोन विशेष सभा
पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचा कार्यकाळ संपण्यास तीन दिवस शिल्लक असताना स्थायी समितीने सभा घेण्याचा धडाका लावला आहे. तीन दिवसात स्थायीच्या तब्बल चार सभा होणार आहेत. उद्या (मंगळवारी)एकाचदिवशी दोन विशेष सभा आयोजित केल्या आहेत. तर, अखेरच्यादिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी या आठवड्याची नियमित साप्ताहिक आणि अर्थसंकल्पाची तहकूब सभा आयोजित करण्यात आली आहे.
महापालिकेच्या विद्यमान स्थायी समितीची 28 फेबुवारीला मुदत संपत आहे. त्याला अवघे तीन शिल्लक आहेत. त्याअगोदर समितीने सभा घेण्याचा धडाका लावला आहे.  आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अधिकारात उद्या दुपारी दीड वाजता एका विशेष सभेच्या आयोजन करण्यात आले आहे. यासभेचे नियोजन आज करण्यात आले. तर, सदस्यांच्या मागणीनुसार आयोजित केलेली  दुसरी विशेष सभा दोन वाजता होणार आहे.