महापालिकेत मद्यपान करून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी:दत्ता साने

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागामध्ये अनेक कर्मचारी मद्यपान करुन कर्तव्यावर येत आहेत. त्यामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग होत आहे. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होऊन नागरीकांचीही गैरसोय होत आहे. महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. त्यासाठी भरारी पथकामार्फत महापालिका कर्मचा-यांची तपासणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे..

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 10 मार्च रोजी नातेवाईकाचा स्मशान दाखला घेण्याकरीता गेलो होतो. त्यावेळी कर्तव्यावर असणारे विनोद शिंदे हे मद्यपान करुन कर्तव्यावर उपस्थित होते. तसेच त्यांनी माझ्याशी उद्धट भाषा वापरुन गैरवर्तन केले.

  • याबाबत माहिती घेतली असता महापालिकेच्या विविध विभागामध्ये अनेक कर्मचारी मद्यपान करुन कर्तव्यावर येत आहेत. त्यामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग होत आहे. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होऊन नागरीकांचीही गैरसोय होत आहे. महापालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. त्यासाठी भरारी पथकांमार्फत अथवा तपासणी पथकामार्फत अचानक भेटी देऊन कर्मचा-यांची तपासणी करण्यात यावी. यामध्ये जे कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी साने यांनी केली आहे.