महापोर्टलचा भोंगळ कारभार; परीक्षा सुरु असताना लाईट गेल्याने परीक्षार्थींचा संताप

0

पिंपरी चिंचवड : महापोर्टल बंद करून पूर्वी प्रमाणेच परीक्षा घ्यावी अशी मागणी सातत्याने विद्यार्थ्यांमधून होत आहे. दरम्यान पुन्हा महापोर्टलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर अचानक वीज गेल्यान परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट येथे हा प्रकार घडला. पाठ्यपुस्त महामंडळाच्या लिपीक पदासाठी आज सोमवारी महापोर्टलकडून परीक्षा घेण्यात आली होती.

दोन तासांच्या या परीक्षेत पहिल्या अर्ध्या तासातच वीज गेली, त्यानंतर गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बाहेर काढले, असा आरोप होत आहे. सोशल मीडियावर पेपर लीक केल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला आहे. पेपर न देता बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा,अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महापोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या महापोर्टलबद्दल मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी खासदार सुळे यांनी केली होती.