महापौर, पक्षनेत्यांकडून निगडी उड्डाणपुलाची पाहणी

0

पिंपरी ः निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानासमोरील उड्डाण पुलाच्या कामाची महापौर उषा ढोरे, पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाहणी केली. पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी समवेत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, गटनेता मनसे सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, नगरसेवक अमित गावडे, उत्तम केंदळे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानदेव झुंधारे आदी उपस्थित होते. तसेच, सांगवी येथील महापालिकेच्या कर संकलन कार्यालयाला देखील महापौर ढोरे यांनी भेट दिली. त्याठिकाणी कर संकलनाच्या प्रशासकीय कामकाजाची पाहणी देखील त्यांनी केली.