महामार्गावर लघुशंका करतांना ट्रकचालकाला उडविले

0

अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू : नशिराबाद गावाजवळील घटना

जळगाव : बांभोरीकडे मजुरांसोबत परतत असतांना रस्त्यात लघुशंकेसाठी ट्रक थांबविला. ट्रकमधून उतरुन महामार्गावर लघुशंका करत असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रकचालक संतोष भावलाल नन्नवरे (वय-30) रा. बांभोरी प्र.चा. याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री नशीराबादजवळ घडली.

दहा फूट नेले फरफटत

याबाबत माहिती अशी की, संतोष नन्नवरे हे ट्रकचालकाचे काम करतात. सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास नशीराबादकडून बांभोरीकडे ट्रकने मजूरांसह परतत होता. यादरम्यान नशीराबादजवळ लघुशंका करण्यासाठी ट्रक उभा केला. यानंतर महामार्गावर लघुशंका करत असतांना महामार्गाहून जाणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिली. या जोरदार धडकेत संतोष दहाफूट दूरवर फेकला गेला होता. त्यांच्या डोक्यांचा गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या मजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी नशीराबाद पोलीसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नशीराबाद पोलीसात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मंगळवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
देण्यात आला.