Wednesday , December 19 2018
Breaking News

महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ठाणे । मोतीबिंदुच्या विकाराने त्रस्त असलेल्या नेत्ररोग रुग्णांना आता आणखी दिलासा मिळणार आहे. कोणतेही ब्लेड किंवा हत्यार न वापरता संगणकाच्या मदतीने मोतीबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे तंत्रज्ञान आता ठाणे शहरात उपलब्ध झाले असून, महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक ब्लेड फ्री लेझर शस्त्रक्रिया ठाणे शहरात करण्यात आली आहे. साधारणत पन्नाशीनंतर डोळ्यांमध्ये मोतीबिंदूची लक्षणे दिसू लागतात आणि मग दिसायलादेखील अस्पष्ट दिसू लागते. एका अभ्यासानुसार 2020 पर्यंत भारतातील मोतीबिंदूने त्रस्त रूग्णांची संख्या साडेसात कोटीच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मोतीबिंदूमध्ये डोळ्यांच्या बुबुळावर एक पडदा तयार होतो. तसेच बुबुळाच्या आतमध्ये मोतीबिंदू पिकू लागतो. सध्या तरी डोळ्यांचे डॉक्टर मोतीबिंदू दोष घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. मात्र, ती हाताने केली जाते. आता रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. ज्यात माणसाचा वापर शस्त्रक्रियेसाठी केला जात नाही. संगणकाच्या सहाय्याने डोळ्यांचे स्कॅनिंग करून लेझरचा वापर करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते तेदेखील रुग्णाला 20 सेकंदात मोकळे केले जाते. मानवी मेंदू व हात वापरून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायला साधारण 10 मिनिटे तरी लागतात. मात्र कितीही काळजी घेतली, तरी छोटीशी मानवी चूक माणसाला फारमोठी किंमत मोजायला लावू शकते. मात्र, नवीन रोबोटिक ब्लेड फ्री लेझरने अचुकता 100 टक्के येते तसेच प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत कोणताही धोकादेखील नसतो.

50 टक्के सवलत
याबाबत अधिक माहिती देताना श्रीरामकृष्णा नेत्रालयाचे डॉ. नितिन देशपांडे म्हणाले की, अमेरिकेतील लेन्सार कंपनीने ही मशीन बनवली आहे. महाराष्ट्रात ही मशीन पहिल्यांदाच श्रीरामकृष्णा नेत्रालयात आली असून आत्तापर्यंत 20 यशस्वी शस्त्रक्रिया या मशीनद्वारे झाल्या आहेत. संगणक पेशंटच्या डोळ्याची मोजणी करून स्कॅनिंग करतो व एक प्रकारची थ्री डी इमेज करून त्याचे संकल्प चित्र डॉक्टरला दाखवतो. डॉक्टरांनी ओके म्हटले की, कोणतेही ब्लेड किंवा हत्यार न वापरता लेझरच्या साहाय्याने नेत्रपटलावरील जमा झालेला पडदा काढून टाकला जातो. मोतीबिंदूने त्रस्त रूग्णासाठी ही शस्त्रक्रिया एकदा केली की पुन्हा मोतीबिंदूचा त्रास उद्भवत नाही. ज्यांच्या बुबुळात जन्मत दोष असतो, तोदेखील या शस्त्रक्रियेद्वारे घालवता येतो. मोतीबिंदूने त्रस्त रूग्णांसाठी आम्ही सामाजिक बांधिलकेच्या भावनेने 50 टक्के सवलतीत शस्त्रक्रिया करून देणार आहोत असे डॉ. नितिन देशपांडे म्हणाले. मशीन आणल्यापासून 20 यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

About admin

हे देखील वाचा

१० वर्षापूर्वीच्या आंदोलन प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन !

मुंबई-२००८ मध्ये करण्यात आलेल्या परप्रांतीयांविरोधातील आंदोलन प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना इगपुरी न्यायलयाने जामीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!