महावीर भगवान जन्म कल्याणक महोत्सव साजरा

0

शहादा। येथे भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव जैन समाजाने आपआपल्या घरी राहुन परिवारासोबत नवकार महामंत्राचा जप तसेच तप साधना करुन अहिंसे प्रतीक महावीर भगवान यांचे जन्म कल्याणक महोत्सव साजरा केला.

शहादा येथे कुंथुनाथ जैन मंदिर व विमलनाथ जैन मंदिर व दादावाडी येथे सकाळी भगवानची आरती पुजा, पाठ करुन गर्दी न करता पुजारीनी केली.
शहादा येथील सकल जैन संघाने एक मताने निर्णय घेवुन घरोघरी तप, साधना, जप आदी आराधना करुन अहिंसेचे प्रतीक महावीर भगवान यांचे जन्म कल्याणक महोत्सव साजरा करून अहिंसे प्रतीक आहोत, असे दाखवुन दिले.

प्रत्येकाने तप, साधना करुन कोरोना महामारी जगातुन दुर पळावी, अशी प्रार्थना केली. तसेच महावीर भगवान यांचे जन्म कल्याणक महोत्सवनिमित्त PPCR मराठा चेम्बर्स आँफ काँमर्सच्या सहाय्याने भारतीय जैन संघटना शहादातर्फे भव्य रक्तदान शिबीर ( ता.१० ते १४) एप्रिल रोजी महावीर भवनात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासोबत जैन युवा शक्ती गृप व संकल्प गृप, जैन श्वेतांबर सोशल गृप, जायटंस गृप व सहेली गृप,आँल इंडिया जैन काँन्फंरंस नई दिल्ली, तेरापंथी युवक परिषद शहादा व उंमग नारी गृप यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबीर घेण्याचे ठरविले आहे. सर्वानी रक्तदान करावे, असे आवाहन शहादा शहराचे अध्यक्ष आशिष छाजेड व जिल्हाध्यक्ष भवरलाल जैन यांनी केले आहे.