महिंद्राकडून ७५०० रुपयात व्हेंटिलेटर

0

मुंबई : भारतात कोरोनाचा जर प्रकोप झाला तर मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे. याबाबत वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने पुढाकार घेऊन 48 तासात हे उपकरण अतिशय कमी म्हणजे 7500 रुपयात तयार केले आहे.

As @GoenkaPk tweeted, we are simultaneously working with an indigenous maker of ICU ventilators. These are sophisticated machines costing between 5 to 10 lakhs. This device is an interim lifesaver & the team estimates it will cost below ₹7,500

महामारीच्यावेळी व्हेंटिलेटरची सर्वाधिक गरज लागते. ५ ते १० लाखांपासून व्हेंटिलेटरची सुरूवात होते. यावर महिंद्रा कंपनीने पुढाकार घेऊन तोडगा काढला आहे. महिंद्राच्या दोन ठिकाणच्या टीमने अवघ्या ४८ तासांत व्हेंटिलेटर तयार केले आहेत. याबाबत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. ‘आम्ही एका आयसीयू वेंटिलेटरच्या स्वदेशी निर्माता कंपनीसोबत काम करत आहोत, ‘ असे त्यांनी म्हटले आहे.