महिलांच्या जनधन खात्यात आजपासून रक्कम जमा होणार

0

3 महिने दरमहा 500 रुपये मिळणार

शहादा: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजना खाते धारक महिलांना येत्या 3 महिन्यात दरमहा 500 रुपये मिळणार आहेत. या रकमेचे वाटप करताना गर्दी होऊ नये, यासाठी वेळापत्रक आखून देण्यात आले आहे

आखून देण्यात आलेले वेळापत्रक असे. ज्यांच्या खात्यांचे शेवटचे क्रमांक 0आणि 1 आहेत त्यांना 3 एप्रिल 2020 रोजी, ज्यांचे शेवटचे क्रमांक 2 व 3 आहेत त्यांना 04 एप्रिल रोजी बँकेतून पैसे काढता येतील. 05 एप्रिल रोजी महावीर जयंती ची सुट्टी व 06 एप्रिल रोजी रविवार आल्याने बँक व्यवहार बंद राहील. 7 एप्रिल रोजी ज्यांच्या खात्याचे क्रमांक 4 आणि 5 आहेत अशांना पैसे काढता येतील. ज्यांच्या खात्याची शेवटचा क्रमांक 6 व 7 आहेत त्यांना 8 एप्रिल रोजी व 8 आणि 9 क्रमांक शेवटी असणाऱ्या खातेधारकांना 9 एप्रिल रोजी पैसे काढता येतील.
या वेळापत्रकानुसार ज्यांना पैसे काढणे शक्य होणार नाही त्यांना 9 एप्रिल नंतर नियमित बँकेच्या वेळेत पैसे काढता येणार आहेत. अशी माहिती युनियन बॅंकेचे शाखाधिकारी श्रीधर राउत यांनी दिली