महिला टी-२० विश्वचषक: ऑस्ट्रेलियाला मात देत टीम इंडियाची विजयी सलामी !

0

सिडनी: महिलांच्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आज भारत आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीने सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मात करत विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९नाबाद) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर १३३ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.