महिला दिनानिमित्त भुसावळात स्त्री शक्तीचा सन्मान

0 2

गुरव समाज महिला मंडळातर्फे महिलांचा गौरव तर राजीव गांधी वाचनालयातही कार्यक्रम ; रेल्वेतर्फे 62 महिला कर्मचार्‍यांचा गौरव

भुसावळ- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध संस्था, संघटनातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी स्त्री शक्तीचा महिमा मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केला तर प्रसंगी महिलांचा गौरवही करण्यात आला. मध्य रेल्वेच्या भुसावळातील डीआरएम कार्यालयात 62 महिला कर्मचार्‍यांचा उत्कृष्ट कामाबद्दल सन्मान करण्यात आला.

भुसावळात 62 महिलांचा गौरव
भुसावळ- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात शुक्रवारी दुपारी उत्कृष्ट कार्य करणार्‍या 62 महिलांचा सन्मानपत्र व शील्ड देवून सन्मान करण्यात आला. महिलांनी प्रसंगी डान्स व गाणे सादर केले. मनोचिकित्सक डॉ.पूनमसिंह बरर्कुल्ला, रजनी सिन्हा, प्रीती मिश्रा, भाग्यश्री कदम, रजनी शर्मा, लता अय्यर, वासंती ओक, सारीका गर्ग, डॉ.प्रतिभा कुमारी, डॉ.रश्मी चौधरी या एसबीएफ कमेटीच्या सर्व महिला अधिकारी, वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा, मंडळ इंजिनिअरींग अभियंता एम.बी.तोमर, मंडळ कार्मिक अधिकारी एम.के.गायकवाड, सहाय्यक कार्मिक अधिकारी राजेंद्र परदेशी, स्टेशन अधीक्षक जी.आर.अय्यर, रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गुरव समाज महिला मंडळातर्फे महिलांचा सन्मान
भुसावळ- गुरव समाज महिला मंडळातर्फे शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी पूलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ललिता अनिल चौधरी यांच्यासह उज्ज्वला सचिन चौधरी, शैला टी.बिराजदार, विमल कोटेचा, प्रियंका कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिस देशमुख यांनी डिजिटल सहेली योजना संगणकाद्वारे समजावून सांगितली. सूत्रसंचालन प्रियंका कांबळे यांनी केले. महिला अध्यक्षा उमा कासोदेकर, ज्योती कळमकर, माया अडावदकर, पल्लवी भांबडकर यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी माजमी अध्यक्ष उमेश कळमकर, जे.बी.कोटेचा, विनोद वाघे, खुशाल कांबळे, राजू गुरव, राजेंद्र अडावदकर, श्रीराम अडावदकर, भालचंद्र ओगले, किशोर भादलीकर, शिरीष शिंदे, संतोष चिनावलकर आदींनी सहकार्य केले.