महिला संघाची घौडदौड: विजयी हॅटट्रिकसह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित

0

मेलबॉर्न: भारतीय महिला संघाकडून चमकदार कामगिरी सुरु आहे. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयाची हॅटट्रिक केली आहे. ऑस्ट्रेलिया, बांगलादेशनंतर आज न्यूझीलंडला भारतीय संघाने लोळवले. हरियानवी १६ वर्षीय शेफाली वर्माच्या फटकेबाजीने आणि गोलंदाजांच्या भेदक माराच्या जोरावर टीम इंडियाने विजयाची हॅटट्रिक साधली. भारताने या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. न्यूझीलंडसमोर १३४ धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र भारतीय गोलंदाजांपुढे न्युझीलंड संघाचा निभाव लागला नाही. तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

१६ वर्षीय शेफाली वर्माच्या कामगिरीचा कौतुक करावे तेवढे कमीच आहे. महिला खेळाडूत तिने विक्रम केले आहे. सर्वाधिक स्ट्राईक रेट तिने तिच्या नावावर केले आहे.