महिला सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांची माहिती

0 1

उद्योगिनी परीवाराचे भविष्य घडवू शकतील -प्रा.धीरज पाटील

भुसावळ- शासनाच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या योजना लाभार्थीपर्यंत पेाहोचण्यासाठी श्रीनगर भागातील प्रा.धीरज पाटील व प्रा.सीमा पाटील या दाम्पत्यांनी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळचे तहसीलदार महेंद्र पवार, नायब तहसीलदार सतीष निकम यांच्या शुभहस्ते या योजनांच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन व वितरणाची सुरुवात केली. प्रसंगी विशाल ठोके, सूरज चौधरी, मृगेन कुलकर्णी, गौरव पवार, अमोल पाटील, सदानंद वराडे उपस्थित होते.

या योजनांचा होणार प्रचार, प्रसार
बेटी बचाओ, बेटी पढाओ तसेच महिला आणि बालविकास विभागाच्या योजना मनोधैर्य योजना, ‘माझी कन्या भाग्यश्री’, जिजाऊ वसतिगृह, अल्पसंख्याक मुलींसाठी वसतीगृहे, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र, राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे, किशोरी शक्ति योजना, शुभ मंगल सामूहिक विवाह योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी अन्नपूर्णा योजना, श्रीशक्ती पॅकेज, भारतीय महिला बँक, सेंट कल्याणी योजना, मुद्रा योजना, महिला विकास योजनांची माहिती पत्रकावर छापण्यात आली असून समाजातील सर्व गरीब, गरजू महिलांना माहिती पोहचवण्याचा संकल्प पाटील दाम्पत्याने केला आहे.

शहरातील विविध भागात पत्रकांचे वाटप
जळगाव रोड परीसरातील श्रीनगर, भोई नगर, खळवाडी, अष्टविनायक कॉलनी, काशीराम नगर, रेल दुनिया, गणेश कॉलनी अयोध्या नगर, हुडको कॉलनी, भुसावळ हायस्कूल परिसर, आराधना कॉलनी, शिव कॉलनी, शालीन पार्क, मोहित नगर, भिरुड कॉलनी परिसरातील भागात माहिती पत्रक देण्यात आले व जनजागृती करण्यात आली. प्रा.सीमा पाटील, दर्शना पाटील, योगिता दुसाने, कोमल पाटील, सुवर्णा पाटील, शिल्पा पाटील, उषा पाटील यांनी सहभाग नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.