जिल्हा पोलीस दलातुन 11 पोलीस अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त

0

जळगांव – जिल्हा पोलीस दलातून 29 फेब्रुवारी रोजही 11 पोलीस अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉल येथे समारंभात पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते पोलीस कर्मचार्‍यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येवुन त्यांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपअक्षिक (गृह) डि.एम.पाटील, सहा.पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील, राखीव पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ, राखीव पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तसेच पोलीस अधीकारी कर्मचारी व मंत्रायलीन कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन पोहेकॉ अमित माळी यांनी केले. यशस्वीतेसाठी सहाय्यक फौजदार रावसाहेब गायकवाड, सतिश देसले, चंद्रसिंग राजपूत, जितेंद्र चौधरी यांनी परिश्रम घेतले.

असे आहेत सेवानिवृत्त कर्मचारी

सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचारी यांच्यामध्ये सहाय्यक फौजदार भागवत आनंदा कोळी, मुश्ताक अहमद अब्दुल्ला अजीज, अशोक सिताराम आढाळे, कैलास विश्वनाथ मारुमर्दाने, उमाकांत बाबुलाल परदेशी, राजु तुकाराम रणधिर, विजय मानसिंग राजपुत, प्रभाकर घोंडु भामरे, त्रंबक लक्ष्मण बाविस्कर, पोलीस हवालदार बळीराम लोटु तायडे, गयासोद्दीन कमरोद्दीन शेख यांचा समावेश आहे.