महेंद्र पाटील यांची खान्देश मराठा मंडळाच्या सदस्यपदी निवड

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड खान्देश मराठा मंडळाच्या सदस्यपदी महेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच निगडीतील सांस्कृतिक भवन येथे मंडळाची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नवीन कार्यकारणीची निवड झाली. मंडळाचे मावळते अध्यक्ष गंगाराम पाटील यांनी अध्यक्ष आणि सदस्य निवडीची घोषणा केली. सदस्यांची निवड पाच वर्षांसाठी झाली आहे. यामध्ये, अध्यक्षपदी गुलाब सैंदाणे, उपाध्यक्षपदी मधुकर पगार, सयाजी पाटील, सचिवपदी मिलिंद पाटील, सहसचिवपदी अनिल सावंत, कोषाध्यक्षपदी भास्कर पाटील, हिशेबनीसपदी जयवंत गुलाब, सैंदाणे शिसोदे, सदस्य महेंद्र पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पाटील, संजय शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. महेंद्र पाटील हे मुळचे (मु. महाळपूर, बहादरपूर,) पारोळा, जि. जळगाव येथील आहेत. 1997 ला नोकरीनिमीत्त ते पिंपरी चिंचवड येथे स्थायिक झाले. त्यांनी खान्देश सांस्कृतिक विकास संस्था पिं.चिं. पुणे, या संस्थेचे सचिव तर लोकमान्य श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. खान्देश को ऑपरेटीव्ह सोसायटीचे ते संस्थापक अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. अनेक वषार्ंपासून माझी भाषा मायबोली अहिराणीसाठी ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर, मायबोली विकास मंच, खान्देश सांस्कृतिक विकास संस्था, अखिल भारतीय खान्देश मंच, आपला माणूस अहिराणी माणूस या संस्थामध्ये त्यांनी पदभार स्विकारला आहे.