माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे अन्नदान

0

नंदुरबार। शहरातील करणचौफुली परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबियांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्यावतीने अन्न दान वाटप करण्यात आले, त्याच प्रमाणे गुजरात मधून आपल्या मुला बाळासह निघालेल्या कुटुंबीयांना शिरपूर या मूळ गावी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, नंदुरबार ते शिरपूर हे अंतर 80 किलोमीटर असल्याने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वतः वाहनांची व्यवस्था करून दिली आहे, कोरोना मुळे भारत लॉकडाऊन असल्याने उदरनिर्वाह साठी बाहेर गावी गेलेले कुटुंब आपल्या मूळ गावी जाण्यासाठी धडपड करीत आहे,