माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक; मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द

0

नंदुरबार: माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मातोश्री विमल रघुवंशी यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. उद्या १५ रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शनिवारी १५ रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होते. मात्र रघुवंशी यांच्या मातोश्रीच्या निधनामुळे त्यांचा नंदुरबार दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे ते नंदुरबारला न जाता थेट जळगाव दौऱ्यावर येणार आहेत.