माजी मंत्री आ.गिरीष महाजनांनी घेतला व्हिडीओ कॉलद्वारे फवारणी कार्याचा आढावा!

0

शहर निर्जंतुकीकरणाची महापौरांनी दिली माहिती : उपक्रमाचे केले कौतुक

जळगाव। शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर भारती सोनवणे या मनपा प्रशासन व समाजसेवकांच्या माध्यमातून निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करीत आहे. बुधवारी माजी पालकमंत्री आ.गिरीष महाजन यांनी व्हिडीओ कॉलद्वारे उपक्रमाचा आढाव घेत कामाची पाहणी केली.

भाऊंचे उद्यान परिसरपासून आकाशवाणी चौकापर्यंत जैन इरिगेशनच्या बंबाद्वारे फवारणी मोहीम बुधवारी राबवली जात होती. महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, उज्ज्वला बेंडाळे, नितीन बरडे उपस्थित असताना आरोग्यसेवक अरविंद देशमुख यांच्या मोबाईलवर माजी पालकमंत्री आ.गिरीष महाजन यांनी व्हाट्सअँपद्वारे व्हिडीओ कॉल केला. शहरात सुरू असलेल्या निर्जंतुकीकरण फवारणी कार्याचा त्यांनी आढावा घेतला.