माणूसकीचे दर्शन; इंद्रायणी थडीच्या जत्रेत हरविलेले पर्स केले परत

0

भोसरी- येथे आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नाने भरविण्यात आलेल्या इंद्रायणी थडीच्या जत्रेत रविवारी 10 फेबु्रवारी रोजी पी.आर.पाटील यांच्या पत्नी संगिता पाटील यांचे पर्स हरविले होते. पर्समध्ये 90 हजाराच्या मोबाईलसह पाच हजार रुपयाची रोकड तसेच कार व घराची चाबी होती. पर्स हरविल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरु झाली. मात्र पर्स सापडले नाही. शेवटी पाटील दांम्मत्य हताश होऊन घरी जायला निघाले. परंतू काही वेळानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य महिला भजनी मंडळी संघटनेच्या अध्यक्षा मिरा कमलाकर काळभोरे, काळुराम पवळे यांनी फोन करुन बोलवून घेतले. त्यांनी चौकशी करुन पाटील दांमत्यांचे हरविलेले पर्स परत केले.

पाटील दांम्पत्यांनी काळभोरे आणि पवळे यांचे आभार मानले आहे. आजही माणूसकी जीवंत आहे अशी भावना त्यांनी दैनिक जनशक्तिकडे व्यक्त केली.