डोक्यात फारशी टाकून पत्नीने पतीचा घेतला जीव

0

जळगाव – पत्नीने फरशीच्या तुकड्याने पतीच्या डोक्यात मारहाण करून स्वतः फिनाईल प्राशन केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. अचानक मानसिक संतुलन बिघडल्यामुळे पत्नीने हे कृत्य केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पती संदीप उत्तम पवार (वय २६) राहणार नेरी याचा रुग्णालयात नेत असतांना मृत्य झाला. तर पत्नी कोमल हिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोमल ७ महिन्याची गर्भवती असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.