मार्च महिन्यापासून बायोमेट्रीक थम्बच्या हजेरीनुसार होणार वेतन

1

मुख्य लेखापरिक्षक संतोष वाहुले यांचे आदेश

जळगाव: मनपात कर्मचार्‍या हजेरीसाठी बायोमेट्रीक थम्ब इंम्प्रेशन मशीन कार्यन्वीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. थम्ब इंम्प्रेशनमध्ये नोंदविण्यात आलेल्या उपस्थितीनुसार वेतन केले जाणार असल्याचे आदेश मुख्य लेखापरिक्षक तथा प्रभारी उपायुक्त संतोष वाहुले यांनी दिलेे. मनपातील काही कर्मचारी उशीरा येतात तर काही कर्मचारी स्वाक्षरी करुन निघून जात असल्याची नेहमीच ओरड असते.

काही दिवसापूर्वी प्रभारी आयुक्त,उपायुक्त आणि महापौरांनी कार्यालयीन वेळेत हजेरी घेतली.तसेच बुधवारी महापौरांनी युनिट कार्यालयात पाहणी केली असता बरेच कर्मचारी गैरहजर आढळून आले आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासकीय इमारतीसह सर्व युनिट कार्यालयात बायोमेट्रीक थम्ब इंम्प्रेशन मशीन कार्यान्वीत करण्यात येत आहे. त्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे.मार्च महिन्यापासून बायोमेट्रीक थम्ब इंम्प्रेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या उपस्थितीनुसारच वेतन अदा केले जाणार आहे. संबंधित कर्मचार्‍यांनी थम्ब इंम्प्रेशन करीता आधार लिंक नसेल अशा कर्मचार्‍यांनी पूर्तता करावी.अन्यथा गैरहजेरी दर्शवून वेतन अदा केले जाणार नाही असे आदेशात म्हटले आहे.