मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित ; शरद पवारांनी दिले संकेत

0 1

पिंपरी-मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच  नव्या पिढीला संधी देण्याची आपली इच्छा असल्याचेही ते म्हणाले. मावळ मतदारसंघ जिंकण्याची संधी असल्याचेही ते म्हणाले.

पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. एकाच कुटुंबातील तिघे लोकसभा निवडणुकीला उभे राहू नयेत अशी भुमिका होती. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करुन आपण माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा आहे. नव्या पिढीला संधी देण्याची आपली इच्छा असल्याचे सांगत त्यांनी पार्थ यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच उमेदवारी जाहीर केली नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार मावळ मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. पार्थ पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील राबता वाढला होता. पक्षाच्या कार्यक्रमासाठी शहरात येत होते. त्यांनी राष्ट्रवादीने शहरात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील घेतला होता.  पार्थ यांनी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदीरात बाप्पाचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेशा केल्याचे बोलले जाऊ लागले होते.

परंतु, दरम्यानच्या काळात पवार कुटुंबातून केवळ आपण एकटाच निवडणूक लढविणार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळे पार्थ यांचे नाव मागे पडले होते. आता पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.