रावेर : दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असूनही नागरीक शासनाने सांगितलेले नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. विनाकारण घराबाहेर फिरणे , मास्कचा वापर न करणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. नियम धाब्यावर बसवून वावरणार्या सुमारे 29 नागरीकांकडून एकूण 15 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात मास्क न लावणार्या 14 व फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवणार्या 15 अशा एकूण 29 जणांविरुद्ध पोलिसांनी धडक दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली. त्यांच्याकडून 15 हजारांचा रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भागवत धांडे, महिला होमगार्ड राणू बारेला, कमल भोई यांनी केली.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.
A big thank you for your article.
These are actually great ideas in concerning blogging.