Wednesday , December 19 2018
Breaking News

मिटमिट्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची बदली करा
विधानसभेत शिवसेना आमदार संजय सिरसाट यांची मागणी

मुंबई :- औरंगाबाद शहरातील कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या मिटमिटयातील आंदोलकांवर पोलीसांनी अमानुषपणे लाठीहल्ला करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याबद्दलचे गुन्हे दाखल केले.पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही.त्यामुळे पोलीसांच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मिटमिट्यातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, पोलीस आयुक्तांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी विधानसभेत केली.

आमदार संजय सिरसाट यांनी औचित्याव्दारे प्रश्न उपस्थित केला.ते म्हणाले संभाजीनगर येथील कचऱ्याचा प्रश्न गेल्या पाच महिन्यापूर्वी उपस्थित झाला. नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी मधस्थी करून हे आंदोलन मागे घ्यायला लावले. परंतु महानगरपालिकेच्या प्रशासनाने कोणतेही पावले उचलले नाही.पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन सूरू करताच मनपा प्रशासनाने जागेचा शोध सुरू केला. पश्चिम विधानसभा मतदार संघातील गोलवाडी, मिटमिटा, गांधेली, कांचनवाडी या ठिकाणी कचरा टाकला जावू नये असा अहवाल तहसीलदारांनी दिलेला असतांनाही मनपा प्रशासनाने गोलवाडी येथे पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यासाठी वाहने नेली. ६०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले. त्याठिकाणी विरोध करणाऱ्या नागरिकांवर पोलीसांनी लाठीहल्ला केला. त्यानंतर काचंनवाडी येथे नागरिकांनी विरोध करताच पोलीसांनी लाठीहल्ला केला, आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. मिटमिट्यातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, पोलीस आयुक्तांची तत्काळ बदली करावी अशी मागणी आमदार संजय सिरसाट यांनी केली.

मनपा प्रशासनावर कारवाई करा
आमदार अतुल सावे म्हणाले मनपा प्रशासनाने कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली नाही. आता प्रशासनाने १४८ दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला.त्यामुळे प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.

माहिती घेवून सभागृहात सविस्तर निवेदन करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले औरंगाबादच्या कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. नगरविकास विभागाच्या मनिषा म्हैसकर यांनी औरंगाबाद येथे जावून बैठक घेतली. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पंचसुत्री तयार केली. त्यानुसार मशनरी खरेदी आणि जमीन खरेदीसाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाईल.मिटमिट्यातील आंदोलकांना पोलीसांनी अमानुषपणे मारहाण केली असली तरी पोलीसही जखमी झाले. पोलीसांना दगडफेक सहन करावी लागली. या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेवून सभागृहात सविस्तर निवेदन केले जाईल.

About admin

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!