‘मिस फर्स्ट-लेडी’ पोहोचल्या दिल्लीच्या शाळांमध्ये !

0

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी, मुलगी आणि जावयासह भारत दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काल गुजरातमधील साबरमती आश्रम आणि मोटेरा स्टेडियमच्या उद्घाटनानंतर ट्रम्प यांनी सपत्नीक लालकिल्ला आणि ताज महलला भेट दिली. आज ट्रम्प दिल्लीला आहे. सकाळी राष्ट्रपती भवन येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आता ट्रम्प यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतील शाळांना भेटी दिल्या. त्याठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. दिल्लीतील शाळा पाहून मिलेनिया यांनी आनंद व्यक्त केला आहे.

दिल्लीच्या शाळांमध्ये ‘मिस ट्रम्प’ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय संस्कृतीप्रमाणे टिळा लावून मिस ट्रम्प यांचे स्वगात करण्यात आले.