ADVERTISEMENT
जळगाव: माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज बुधवारी प्रथमच त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात मेळावा घेतला. राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर सातत्याने ते भाजपला लक्ष करत आहेत. दरम्यान आज देखील त्यांनी भाजपला लक्ष केले आहे, मी भाजपात असतांना परिस्थीती अशी निर्माण केली की, दुसऱ्या पक्षात जावे लागले असा हल्लाबोल खडसे यांनी केला. ‘बहुजनांना न्याय देणाऱ्या पक्षात आलो, शरद पवार यांनी मला प्रवेश दिला त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो’ असे खडसे यांनी सांगितले आहे.