मुंबईच्या महिलेचे बसमधून 50 हजारांचे दागिने लंपास

0

यावल- भुसावळहुन यावलकडे येणार्‍या आणखी एका प्रवासी महिलेचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे 50 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना 28 रोजी घडली असून या प्रकरणी सोमवार, 3 रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार गौरी रवींद्र वंजारी (24, रा.तुर्भे, मुंबई) या मुंबईहुन पाटलीपुत्र एक्सप्रेसने भुसावळला आल्यानंतर त्या 28 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास बसमध्ये प्रवास करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेची चैन तोडून त्यातील पाच ग्रॅमचे मंगळसुत्र, एक ग्रॅम सोन्याची पोत असे 27 हजारांचे दागिने तसेच रोकड मिळून एकूण 50 हजारांचा ऐवज लांबवला. यावल शहरातील फालक नगर बस थांब्यावर सकाळी 8.20 वाजेच्या सुमारास घरी आल्यावर चोरी लक्षात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.