मुंबई:मुंबई जवळ गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत भूकंपाची मालिका सुरू असून, गेल्या आठवड्यात गुजरामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता मुंबईत भूकंपाचे धक्के बसले आहेत. मुंबईजवळच्या
परिसरात उत्तरेला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केद्राने याबाबत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
एका वृत्तसंस्थेनं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईपासून १०३ किलोमीटर उत्तर दिशेला भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
या भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले.