मुंबईत मास्कशिवाय बाहेर पडल्यास अटक होणार: महापालिकेचे आदेश

0

मुंबई : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहे. त्यातही मुंबईत सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता कठोर पावले उचलली आहे. आता मुंबईत मास्कशिवाय कोणी बाहेर पडल्यास थेट अटक करण्यात येणार असून कलम 188 नुसार कारवाई केली जाणार आहे. मुंबई महानगर पालिका आयुक्त परदेशी यांनी आदेश पारित केले आहे. आजही मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.