मुंबईत २१ मजली इमारतीला आग ; अग्निशमन दलाचे जवान जखमी

0

नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरूळ येथील सीवूड्स सेक्टर ४४ मधील सी होम्स या २१ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी ७ च्या सुमारास नेरुळमधील सीवूड्स सेक्टर ४४ मधील सी होम्स या इमारतीच्या १८ व्या आणि १९ मजल्यावर आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र, ही आग मोठी असल्याने ती विझवणे जिकिरीचे धाले होते. इमारत गगनचुंबी असल्याने ही आग वेगाने पसरत होती. उंचीवरील आग विझवताना अनेक अडथळे येत असल्याने यात शर्थीचे प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे ७ जवान जखमी झाले.

अखेर तीन तासांनंतर, म्हणजेच १०.३० वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.