Friday , February 22 2019

मुंबईसह राज्यात सर्वत्र थंडीची लाट

मुंबई : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांचा पारा घसरला असून सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. महाबळेश्नरमध्ये पारा शून्य अंशाच्या खाली उतरला आहे. मुंबईत काल कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मागील १० वर्षातील हे सर्वात अधिक कमाल तापमान होते. सांताक्रुझमध्ये पारा १४.४ तापमानाची नोंद झाली असून पारा २४ अंश सेलसियसपर्यंत खाली उतरला आहे. महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात बर्फाची चादर पसरल्याच पाहायला मिळाली आहे. पर्यटक या गुलाबी थंडीचा चांगलाच आनंद लुटत असतानाच पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये हेच तापमान कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पुढील दोन दिवस गारवा कायम राहणार 

हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार पुढील दोन दिवस वातावरणात गारवा कायम राहणार असून त्या नंतर हळुहळु तापमान वाढायला सूरवात होईल. फेब्रवारी महिन्याच् आठदिवस उलटले असले तरी वातावरणात गारवा कायम असल्याने लोक या बोचऱ्या थंडीचा आनंद घेत आहेत. १५ फेब्रवारीपर्यंत वातावरणात गारवा राहणार असून फेब्रवारी महिन्यातील आतापर्यंतच्या कमी तापमानाची अनेक ठिकाणी  नोंद झाल्याची माहीती देखील हवामान तज्ञांकडून मिळाली आहे.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

बसस्थानकातून चार लाखांचे दागिने असलेली बॅग लांबवली

जळगाव | जळगाव येथील नवीन बसस्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातून 411006 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!